नवनीत कौर यांना ४४ हजारांची आघाडी

अमरावती :

शिवसेनेचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ म्हणून चर्चेत असलेल्या अमरावतीमध्ये काँग्रेस आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत कौर-राणा यांनी सुमारे ४४ हजारांची आघाडी घेतली आहे. विदर्भातील ही जागा आघाडीच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात यंदा भाजपला जोरदार फटका बसण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, तरीही या विभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यातच अमरावतीमध्ये आधी पिछाडीवर असलेल्या नवनीत कौर यांनी शिवसेनेचे उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर ४४ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. नवनीत यांनी ही आघाडी कायम ठेवल्यास येथे त्यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यत (सायंकाळी ४.२० वाजता) मिळालेळे मतदान :

नवनीत कौर : 445668

आनंदराव अडसूळ : 400938

गुणवंत देवपरे (वंचित आघाडी) : 55830

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*