भिंगेंमुळे चव्हाण विजयापासून ‘वंचित’..!

नांदेड :

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने राज्यभरात प्रचार करताना आपल्याच मतदारसंघात दुर्लक्ष झाल्याचा मोठा फटका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना मिळालेल्या १ लाख ५१ हजार मतांमुळे नांदेडमधून चव्हाण विजयापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२०१४ प्रमाणेच यंदाही महाराष्ट्र व देशात कॉंग्रेसच्या विरोधी लाट जोमात आहे. मात्र, मागील निवडणुकीत जागा राखणाऱ्या चव्हाण यांना यंदा पराभवाची चव चाखावी लागणार असेच चित्र आहे. येथील मतमोजणी सुरु असून दुपारी ४ वाजेपर्यंत येथील भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चव्हाण यांच्यावर सुमारे ४३ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्याचवेळी येथील वंचित आघाडीचे उमेदवार भिंगे यांनी १ लाख ५१ हजार मतदान घेतले आहे. एकूणच वंचित आघाडीमुळे कॉंग्रेसला राज्यभरात अनेक ठिकाणी जसा फटका बसला आहे, तसाच नव्हे तर अगदी विजय हिरावून घेणारा फटका नांदेडमध्ये बसला अआहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*