वायनाडमध्ये मोठी आघाडी, तर अमेठीत पिछाडीवर

दिल्ली :

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका करीत अमेठी (उत्तरप्रदेश) मतदारसंघात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, राहुल गांधी उमेदवारी करीत असलेल्या वायनाड (केरळ) येथील जागेवर मात्र कॉंग्रेसला मोठी विजयी आघाडी मिळाली आहे.

वायनाड मतदारसंघात ४.३० वाजेपर्यत गांधी यांना ६ लाख ५७ हजार ५१३ मतदान मिळाले आहे. त्याचवेळी या जागेवरील कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार पी.पी. सुनीर यांना येथून फ़क़्त २ लाख ५४ हजार ८२१ इतके मतदान मिळाले आहे. येथून गांधींना ४ लाख २ हजार ६९२ मतांची आघाडी मतदारांनी दिली आहे. तर, काँग्रेस आणि गांधी घराण्याशी घनिष्ट नाते असलेल्या अमेठी येथून मात्र, राहुल गांधी यांना मात देण्यासाठी स्मृती इराणी यांनी सुमारे २० हजारांची आघाडी घेतली आहे. अमेठीत गांधी यांचा विजय होणार की पराजय, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*