कॉंग्रेसचे एक पाउल मागे; घेतला हा निर्णय

पुणे :

लोकसभा निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या भाजपने पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेस या प्रमुख विरोधी पक्षासह इतरही छोटे-मोठे विरोधी पक्ष भांबावले आहेत. अशावेळी कॉंग्रेसने एक पाउल मागे घेत पुन्हा नवीन जोमाने उतरण्यासाठीचा संदेश देणारा निर्णय घेतला आहे.

कॉंग्रेस पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना पुढील महिनाभर कोणत्याही वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात जाऊन न बोलण्याचा आदेश आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याबाबत अधिकृत ट्विटर पोस्ट शेअर केली आहे. अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीमाने दिलेले आहेत. त्यावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. अशावेळी सर्व पक्षाची पुन्हा एकदा बांधणी करण्यासाठी म्हणून पक्षाने महिनाभर प्रवक्त्यांना न बोलण्याचे निर्देश दिल्याचे समजते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*