तोंडपाटीलकी नको, पक्षबांधणी महत्वाची; कॉंग्रेसचा निर्देश

पुणे :

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला विशेष यश न मिळाल्याने राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य गंभीर विचारमंथन करीत आहेत. पक्षांतर्गत महत्वाचे बदल करण्याच्या या महिनाभराच्या कालावधीत ‘तोंडपाटीलकी नको, पक्षबांधणी महत्वाची’ असल्याचा संदेश दिल्लीतून देण्यात आला आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी अधिकृतरीत्या ट्विट करून हा निर्देश दिल्याच्या पोस्टला अनेकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. तर, भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यावरून प्रति’वाद’ सुरू केलेला आहे.

पुढील महिनाभर पक्षाच्या प्रवक्त्यांनी वृत्त वाहिन्यांवर चर्चेसाठी न जाण्याचे त्यात सूचित केलेलं आहे. तसेच संपादक व पत्रकारांनाही पक्षाच्या कोणालाही चर्चेत न बोलाविण्याची विनंती सुरजेवाला यांनी केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*