महाराष्ट्र कॉंग्रेसने घेतला राजकीय आढावा

मुंबई :

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आता किमान विधानसभा निवडणुकीत तरी जोरदार पुनरागमन करण्याची अपेक्षा महाराष्ट्र कॉंग्रेस नेतृत्वाला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी व इतर मित्रपक्षांशी जागावाटपाच्या चर्चेत विधानसभा मतदारसंघनिहाय कोणती भूमिका घ्यायची, हे ठरविण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसची बैठक झाली आहे.

याबद्दल पत्रकारांना माहिती देताना प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले की, मागील आठवड्यात झालेल्या बैठकीतील चर्चा पुढे नेण्यासाठी आजच्या बैठकीत विचारविमर्श झाला आहे. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून अनेकांनी तालुका व जिल्हाध्यक्ष पदाचे राजीनामे दिलेले आहेत. तसेच पक्ष पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*