संघाशी संघर्ष हीच कॉंग्रेसची भूमिका : चव्हाण

मुंबई :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व कॉंग्रेस पक्ष यांच्या भूमिकेत मोठा बदल आहे. उलट संघाशी संघर्ष हीच कॉंग्रेसची खरी भूमिका आहे. सध्या तोच संघर्ष सुरू आहे. त्यांच्याकडून घेण्यासारखे विशेष असे काहीच नाही, अशी भूमिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संघाप्रमाणे काम करण्याची भूमिका पुण्यात मांडली होती. त्यावर प्रश्न विचारल्यावर चव्हाण यांनी पत्रकारांना संघ व कॉंग्रेस यांच्या भूमिकेसह संघर्षाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचे काम केले आहे. आताही तशीच चळवळ देशात नक्की उभी राहील. पवार साहेबांची भूमिका वैयक्तिक आहे. त्यावर कॉंग्रेस बोलणार नाही. मात्र, संघाचे अनुकरण कॉंग्रेस कदापीही करणार नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*