विखेंनी आता त्यांच्याशीही घोटाळ्यावर बोलावे : चव्हाण

मुंबई :

कॉंग्रेस पक्षात असताना राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली होती. अनेक घोटाळे त्यांनी उघडकीस आणले होते. आमचा पक्ष सोडला की त्यांच्या भूमिकेत कसा बदल झाला हे माहित नाही. मात्र, आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घोटाळ्यावर बोलावे अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून व्यक्त केली.

मुंबईत पत्रकारांनी विखे पाटील यांच्या बदललेल्या भूमिकेकडे चव्हाण यांचे लक्ष वेधले. त्यावेळी चव्हाण यांनी विखे यांच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले की, नगर जिल्ह्यातील बाराही जागा जिंकण्याचा त्यांचा आत्मविश्वास फाजील आहे. तसेच त्यांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*