बळीराजाचे नाही तर ‘तळीराजां’चे : राष्ट्रवादी

पुणे :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिअर कंपन्यांना पाणी देण्याबाबतची माहिती सांगताना मांडलेल्या भूमिकेवर आक्षेप घेऊन राष्ट्रवादीने टीका केली आहे. ट्विटरवर एक विशेष कार्टून प्रसिद्ध करून राष्ट्रवादीने राज्य सरकारला तळीराजांचे सरकार म्हणून टोला हणाला आहे. त्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली आहे.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पाणीटंचाईग्रस्त मराठवाड्यात बीअरची विक्री १४% वाढली. @CMOMaharashtra व ग्रामविकास मंत्र्यांनी #BEER कंपन्यांच्या मद्ययुक्त शिवाराची तळी उचलली आहे. बळीराजा मेला तरी चालेल पण तळीराजा झिंगला पाहिजे हे सरकारचे धोरण आहे का? तरुणाई व्यसनाधीनतेच्या वाटेवर का, याची कारणं कधी शोधणार?’

https://twitter.com/NCPspeaks/status/1137010875724779520?s=19

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*