विखेंच्या मंत्रीपदाकडे राज्याचे लक्ष

अहमदनगर :

कॉंग्रेस पक्षात असताना विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावून घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश ही फ़क़्त एक औपचारिकता बाकी आहे. मात्र, भाजपवासी झाल्यावर मंत्रिमंडळ विस्तारत त्यांना कोणत्या विभागाची जबाबदारी मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्याकडून उमेदवारी मिळत नसल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बंडखोरी केली होती. पुत्राच्या पाठीमागे मग राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भाजपचा प्रचार करीत नगरसह शिर्डीची जागा भाजप-शिवसेना युतीच्या खिशात टाकली. तसेच राज्यातील अनेक जागांवर युतीचे उमेदवार विजयी होण्यासाठी विखे पाटील यांच्यामुळे फायदा झाला. त्यामुळेच विखे पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळात घेत महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारत त्यांना कोणत्या विभागांचे मंत्रिपद देणार यावर राज्यभरात चर्चा सुरू आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*