म्हणून १.६० लाख लोकांना हलवले सुरक्षितस्थळी

मुंबई :

वायू या चक्रीवादळाने मॉन्सून बाधित करण्यासह देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर धडक देण्यास सुरुवात केली आहे. वादळाचा वेग व दिशा लक्षात घेऊन कोकण व मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यासह गुजरातमधील सुमारे १ लाख ६० हजारे लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

गुजरातमध्ये सौराष्ट्र व कच्छ या भागात सुमारे १४५-१५५ प्रतितास या वेगाने हे चक्रीवादळ येत आहे. मुंबई व कोकणात यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात याचा परिणाम तुलनेत कमी जाणवणार असतानाच गुजरात राज्यात मात्र यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यानुसार केंद्र व तेथील राज्य सरकारने काम सुरू केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*