विखेंना काटशह देण्यासाठी थोरात आक्रमक

अहमदनगर :

जिल्ह्यातील विखे विरुद्ध थोरात गटाचा आता नवा अध्याय लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाला आहे. त्यात दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी रिंगणात उतरल्याने त्याचा निकाल काय लागणार याच्याही चर्चा रंगत आहेत.

ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील या पिता-पुत्रांनी संगमनेर तालुक्यात विशेष लक्ष घालून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून थोरात यांनी राहत्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेतली आहे. त्या बैठकीत ‘एकीने लढायचे आणि जिंकायचे,’ हा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

या बैठकीत आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. एकनाथ गोंदकर, सुधीर म्हस्के, बाळासाहेब विखे, सिमोन जगताप, बाळासाहेब गायकवाड, एकनाथ घोगरे, विक्रम दंडवते, विजय जगताप, श्रीकांत मापारी, रावसाहेब बोटे, नंदु सदाफळ, शंशीकांत लोळगे, अरूण पाटील कडू, बाळासाहेब खर्डे, विजय नालकर, संजय नालकर, दादासाहेब पटारे, सुभाष निर्मळ, अमित शेळके, सुभाष वर्पे आदींसह काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी विखेंना राहत्यात अडकून ठेवण्यासह जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*