म्हणून बाळासाहेब थोरतांना मिळाली ही संधी

अहमदनगर :

नगर जिल्ह्यातील विखे-थोरात यांच्या गटातील विळ्या-भोपल्याचे सख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी काँग्रेसला घाटात सोडून देत भाजपवासी झालेल्या विखे यांना रोखण्यासाठी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाने थोरात यांना राज्यातील विधिमंडळ नेतेपदी संधी दिली आहे.

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पदावर काम करण्याची संधी देऊन काँग्रेसने विखे यांच्यासह भाजपला वेगळा संदेश दिला आहे. कोणत्याही प्रकारे विधानसभा निवडणुकीत थंड डोक्याने विजय मिळावीत पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेण्यासाठी थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सज्ज झाल्याचा हा संदेश आहे. त्याला भाजपचे नेतृत्व व विखे गट कशा पद्धतीने काटशह देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*