मंत्रिमंडळ नाही तर पक्षाचा विस्तार; दिल्लीचे निर्देश..!

अहमदनगर :

विधानसभा निवडणुकीला अवघे अडीच महिने बाकी असल्याने आता मंत्रिमंडळ विस्तार करण्यापेक्षा पक्षाचा विस्तार करण्याचे निर्देश दिल्लीमधील भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने महाराष्ट्राला दिलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेकांचे मंत्री होण्याचे स्वप्न भंगणार आहे. मात्र, मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही विस्ताराची आस सोडलेली नाही.

मंत्रिमंडळ आणि पक्षाविस्तर एकाचवेळी करून घेण्याची मुख्यंमत्री फडणवीस यांची खेळी आहे. त्यानुसार त्यांनी नियोजन केलेले आहे. मात्र, अशा पद्धतीने विस्तार करताना राज्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्री हे पदही द्यावे लागणार आहे. ऐन निवडणुकीच्या मोसमात मित्रपक्ष सेनेची ताकद आणखी वाढू देण्याची केंद्रीय भाजपची इच्छा नाही. तसेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्षात घेऊन मंत्रिपद देण्यास नागपूरमधील संघाच्या टीमचा विरोध आहे. त्यांनी आपली भावनाही दिल्लीला कळविली आहे. त्यानुसार राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रोखण्यात आलेला आहे. मात्र, फडणवीस यांनी विस्तार करण्यासाठी केंद्रातील भाजपला तयार करण्याचे धोरण अजूनही सोडून दिलेले नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी इच्छुकांना अपेक्षा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*