नगर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस..?

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीत अगदीच वाईट पध्दतीने देशभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, तरीही या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते मंडळींनी कोणतीही शिकवण घेतली नसल्याचे नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जागावाटपात या दोन्ही पक्षात धुसफूस सुरू आणल्याने विधानसभा निकलाही या पक्षांसाठी मोठा धडा शिकवणारा ठरण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस पक्ष नगर जिल्ह्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित झाला आहे. तर, राष्ट्रवादी लोकसभेत पराजित होऊनही आपला तोरा सोडण्याच्या विचारात नाही. त्यांचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी जिल्ह्यातील १२ पैकी ९ जागांवर दावा केला आहे. राज्य सरकारमध्ये नव्याने सामील झालेले राधाकृष्ण विखे यांच्यामुळे भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनीही यंदा जिल्ह्यातील सर्व जागा भाजप-शिवसेना युतीला मिळवून देण्यासाठी प्रचार सुरू केला आहे. अशावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामधील बेबनाव युतीची ताकद वाढविण्यासाठी महत्वाचा ठरत आहे. त्यातून ज्येष्ठ नेते शरद पवार कसा मार्ग काढणार, यावर आघाडीचे भवितव्य ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*