‘समृद्धी’साठी ५५ हजार कोटी; ३.३६ लाख किमी रस्त्याचे उद्दिष्ट

मुंबई :

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे उद्दिष्ट व आकडे जाहीर करून महाराष्ट्रातील मतदारांना साद घातली आहे. रस्ते विकासाला पुन्हा एकदा या सरकारने प्राधान्य दिले आहे.

प्रमुख घोषणा : रस्ते विकास योजनेसाठी 3 लाख 36 किलोमीटर रस्त्याचे उद्दीष्ट, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २० हजार किलोमीटचे उद्दीष्ट, रस्त्यांसाठी ४२५४ कोटीचे कर्ज यासाठी आशियाई बँकेकडून उपलब्ध करून घेणार आहोत, समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपये खर्च होणार आहे , सदर काम जलतगतीने सुरू आहे, मुंबई-पुणे महामार्गाचे अंतर कमी करण्यात येणार असून त्यासाठी ६ हजार कोटी रुपये खर्च, त्याचे काम प्रगतीपथावर, तिसऱ्या खाडीपुलाचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी ६७५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*