व्यापारी- उद्योजकांना महाराष्ट्रात सुविधा : मुनगंटीवार

मुंबई :
ईज ऑफ डुईंग बिझिनेससाठी आवश्यक असलेली व्यापारसुलभता वस्तु आणि सेवा कर प्रणालीत अंतर्भूत करण्याकरिता निरंतर प्रयत्न सुरु असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. महाराष्ट्र कर व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड असलेला अध्यादेश पारित करण्यात आला असून त्याअंतर्गत व्यापारी उद्योजकांना विविध सुविधा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

वस्त्रोद्योगाला चालना
राज्यातील वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सवलतीच्या दराने वीज योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी ५४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना दीर्घ मुदतीच्या कर्जाच्या व्याजाच्या अनुदानापोटी ३६७ कोटी रुपयांचे वितरण मागील चार वर्षात करण्यात आले. तर १० टक्के अर्थसहाय्य म्हणून १८० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*