लघु उद्योगासाठी ५० तालुक्यात विशेष प्रकल्प..!

मुंबई :
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून या अंतर्गत या वर्षी १० हजार लघु उद्योग सुरु करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांकरिता पार्क तयार करण्यात येणार असून पथदर्शी प्रकल्प म्हणून ५० तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. यात ३० टक्के भुखंड महिला उद्योजकांकरिता राखीव ठेवण्यात येणार असून योजनेसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारतर्फे विधिमंडळात देण्यात आली.

अटल अर्थसहाय्य योजनेसाठी ५०० कोटी रुपये
अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत विविध सहकारी संस्थांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.भावांतर योजनेअंतर्गत द्यावयाच्या अनुदानासाठी ३९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पायाभूत सुविधांसाठी १६ हजार कोटी रुपयांचा निधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची सुधारणा,ठाणे खाडी पूल (तिसरा पूल), वांद्रे वर्सोवा सागरी मार्ग, शिवडी न्हावा शेवा मुंबई पारबंदर प्रकल्प अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास १६ हजार २५ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नगरविकासासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा भरीव निधी
नगरविकास विभागासाठी एकत्रित ३५ हजार ७९१ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*