शरद गवत आण, छगन कमळ बघ, दादा कमळ बघ; मुख्यमंत्र्यांनी ऊडवली खिल्ली

मुंबई :
बालभारतीच्या गणिताच्या पुस्तकातील संख्यावाचनाच्या प्रकारामुळे गोंधळ माजला आहे. काल- परवापासुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या आडनावामुळे ट्रोल केलं जात आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी खेळीमेळीत उत्तर देताना पुस्तकाचा आधार घेत विरोधकांची खिल्ली उडविली.

मुख्यमंत्र्यांवर टीकेची संधी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सोडली नाही. अजित पवारांनी गणिताच्या गोंधळात फडण’वीस’ यांना फडण वीस आणि शुन्य म्हटलं तर चालेल का असा सवाल उपस्थित केला होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद गवत आण, छगन कमळ बघ, दादा कमळ बघ हि बालभारतीच्या पुस्तकातील वाक्ये बोलून दाखवली आणि सभागृहात जोरदार हशा पिकला. सभागृहातील सदस्यांचा आणि या वाक्यांचा काहीही संबंध नाही हे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*