आधी योगा, नंतर दगा..!

रोहतक, हरियाना :

भारतीय मानसिकता म्हणजे दिखाऊ जास्त आणि कृतीत कमी अशीच असते. त्याचाच प्रत्यय योग दिनाच्या कार्यक्रमात हरियाणा राज्यात पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना कार्यकर्ते कसे हरताळ फासत आहेत, हेच यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

काल विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. योगा विषयी काल विविध योगगुरूंनी नेत्यांनी, अभिनेत्यांनी महत्व सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या रांची येथे योगा केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग गुरु रामदेव बाबा यांच्यासोबत नांदेडमध्ये योगासने केली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूरमध्ये योग केला.
काल अमित शहा यांनीही हरियानामधील रोहतक येथे लोकांसमवेत योगा केला पण अमित शहा निघताच लोकांनी तिथल्या योगसाधनेसाठी दिलेल्या चटया पळवल्या. आधी योगा नंतर दगा अशी अवस्था तेथील लोकांनी केली आहे. यावेळी अमित शहांसमवेत हरियानाचे मुख्यमंत्री एमएल खट्टर उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*