विखे फॅक्टर ठरविणार नगरचे गणित..!

अहमदनगर :

दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी उत्तरेत राहूनही नगर दक्षिण आणि राज्यभरात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचे जाळे पसरवून ठेवले होते. त्याच धर्तीवर आता खासदार डॉ. सुजय विखे यांनीही जिल्हाभरात आपले जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात विखे फॅक्टर जय-पराजयचे गणित ठरविणार आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून उमेदवारी डावलली जात असल्याच्या कारणास्तव डॉ. सुजय यांनी भाजपात प्रवेश करून खासदारकी हस्तगत केली. त्यानंतर आता मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही अधिकृतपणे भाजपवासी होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद वाढविली आहे.

आगामी निवडणूकीत जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागांवर युतीचे उमेदवार विजयी होणार असल्याची घोषणा विखे गटाने केली आहे. त्यानुसार खासदार डॉ. विखे यांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे विखे फॅक्टर काय गणित मांडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*