म्हणून पालकमंत्री शिंदे यांची हकालपट्टी करा; अक्षय शिंदे यांची मागणी

अहमदनगर :
पालकमंत्री राम शिंदे यांनी राज्यातील जलसंधारणाच्या कामात २२ टक्क्यांपेक्षा जात भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्या संपत्तीच्या वाढीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करुन त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी चोंडी येथील ग्रामस्थ अक्षय शिंदे यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आले. त्यांच्यासमवेत सुरज छजवरे, डॉ.अनिल मच्छिंद्र, अ‍ॅड.प्रशांत साठे, अजय जाधव आदि उपस्थित होते. अक्षय शिंदे यांनी म्हटले आहे की, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जलसंधारणाच्या कामातील भ्रष्टाचाराबद्दल तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. उत्तर देताना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी भ्रष्टाचार झाल्याचे मान्य करून उच्चस्तरीय समिती नेमल्याचे सांगितले. यापूर्वी जलसंधारण मंत्री असलेले राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या प्रत्येक कामात २२ टक्क्यांपेक्षा जास्त टक्केवारी घेतली आहे. शिंदे यांनी भ्रष्टाचाराने मोठ्या प्रमाणात पैसा मिळवला आहे. याच कमाईमधून त्यांनी अलिशान बंगला बांधला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*