इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्यावर असे करा रिकव्हर

सेशल मिडीयाच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ व विचार मांडणाऱ्यांचा आवडता अड्डा म्हणून इंस्टाग्राम अॅपला जगभर मान्यता मिळाली आहे. मात्र, फेसबुक, ट्विटर यासह आता इंस्टाग्रामचे खातेही हॅक होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून कंपनीने आता अकाऊंट हॅक झाल्यावरही होणार रिकव्हर करण्याची सोय देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही सोय युजर्सना मिळणार आहे.

अकाऊंट हॅक झाल्यावर अनेकदा त्याची पूर्ण माहिती बदलली जाते. अशावेळी आपले खातेही दिसत नाही. आपले खाते कोणते, हेही शोधणे अशक्य होऊन जाते. या डोकेदुखीमुळे अनेकजण हैराण झाल्याचा रिपोर्ट आल्याने इंस्टाग्रामने खाते रिकव्हर करण्याची सोय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आपले खाते हॅक झाल्यास रजिस्मोटर केलेला मोबाईल नंबर किंवा इमेल यांच्या मदतीने खाते पूर्ववत करता येईल. त्यातील अपेक्षित बदलही खातेदार करू शकतील. त्यासाठी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर किंवा मेलवर ६ आकडी वन टाईम कोड येईल. तो वापरून आपले खाते पूर्ववत करून ते वापरण्याची सोय इंस्टाग्राम देणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*