हीच का अच्छे दिनची कन्सेप्ट : मुंडे

मुंबई :
सरकारने काजूू आयात करून काजूचे भाव पाडले. तसेच घरपोच दारू पोहोचविण्याचे धोरण आणले. हीच का फडणवीस सरकारची अच्छे दिनची कन्सेप्ट आहे, असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ते म्हणाले की, कॅगचा अहवाल मागच्या अधिवेशनात ठेवला. मात्र, मागील ४ महिने वारंवार मागणी करूनही त्याची मराठी प्रत मिळाली नाही. आम्ही मांडलेल्या प्रश्नांना उत्तर दयायची आणि बजेटमध्ये राज्यातील जनतेला दिलासा देण्याची सरकारला संधी होती. मात्र, ती संधीसुध्दा सरकारने गमावली आहे.

राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात आल्याचा मुद्दा मांडताना मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यास सरकार काय उतरत देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*