म्हणून अर्जुन-मलायकाची रोमॅन्टीक स्टोरी ट्रेंडमध्ये

मुंबई:
बाॅलीवूडचा आघाडीचा अभिनेता सध्या अर्जुन कपूर हा कुठल्या सिनेमामुळे चर्चेत नाही. तो चर्चेत आहे फक्त मलायका अरोरामुळे. ते एकमेकांना डेट करत आहेत. रिलाशनशिपमधे आहेत. अशा बातम्या समोर आल्या असल्या तरीही आतापर्यंत त्यांनी एकदाही आपल्यात नेमके काय नाते आहे ते कबूल केलेले नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन व मलायकाच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. अर्थात अलीकडे एका मुलाखतीत, मला लग्नाची कुठलीही घाई नाही, असे अर्जुनने स्पष्ट केले होते.

काल अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मलायका दोघांचा एकत्र फोटो शेयर करत “माझा क्रेझी, फनी आणि अमेझिंग अर्जुन कपूर वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप प्रेम,आनंदी राहा” असे रोमॅन्टिक कॅप्शन तिने या फोटोला दिले.

या रोमॅन्टिक कॅप्शनवरून तरी आपण प्रेमात असल्याचा सुचक ईशारा तिने दिला आहे तसेच तिने पहिल्यांदाच अर्जुनसोबत फोटो शेयर केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*