काँग्रेस वंचीतशी आघाडी करणार..!

हायकमांडचे वंचितशी समझोत्याचे आदेश

दिल्ली :

काल दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत वंचीत बहुजन आघाडीशी जुळवून घेण्याचे आदेश काँग्रेस हायकमांडने राज्यातील काँग्रेसला दिले आहेत.

काल दिल्लीत झालेली बैठक कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दिल्ली येथील बैठकीत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसह इतरही नेते उपस्थित होते. यावेळी अशोक चव्हणांनी दिलेल्या राजीनामा प्रकरणावर कुठलीच चर्चा झाली नाही.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. वंचित बहुजन आघाडीमुळे दलित आणि मुस्लीम मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला. याचा विचार करूनच वंचितशी संधान साधा अन्यथा अजुनही नुकसान होऊ शकते असे लक्षात आल्याने हे आदेश दिल्याचे कळते. मात्र किती जागा कुणाला असतील यावर अजुनही साशंकता आहे. त्यातच वंचित सोबत आल्यावर काँग्रेस सोबत असलेल्या घटक पक्षांचे काय? हाही प्रश्न उरतोच.

त्यामुळे आता काँग्रेसला अनेक बाजूंनी आणि सर्व स्तरांवर विचार करून समाधानकारक प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला द्यावा लागणार आहे. यानंतरही वंचित बहुजन आघाडीने एका तारखेचा अल्टीमेटम काँग्रेसला दिल्याचे कळते. जर त्या तारखेपर्यंत प्रस्ताव आला नाही तर वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत नसेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*