काँग्रेसच्या घडामोडींना वेग

नवी दिल्ली :
काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज दिल्ली येथे बैठकीत संवाद साधणार आहेत. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी हे उपस्थित असतील.

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोण या पदावर बसणार यावरही या बैठकीत अंतिम निर्णय होईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

यापूर्वी झालेल्या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही राज्यात सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत नेमकी काय चर्चा घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*