सल्लूमियाला मराठीतील भाषणाचे भारी कौतुक..!

मुंबई :
‘भारत’च्या प्रमोशननंतर निवांत असलेला बाॅलीवूड का भाईजान सलमान खान हा नेहमीच आपले मजेदार व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतो. नुकताच त्याने एका छोट्या मुलीचा भारताविषयी भाषण करतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे.

ज्यात ती मुलगी मराठीतुन प्रजासत्ताक दिनाविषयीचे भाषण करत आहे. सलमान तिचे ते भाषण ऐकून घेतो आणि कौतुक करतो. सलमान असेच व्हिडीओ सातत्याने पोस्ट करत असतो. सलमान कधी आपल्या पुतण्यांसोबत हॅन्ड स्लॅप खेळताना दिसतो तर कधी वडिल सलीम खान यांच्यासोबत गाणे म्हणताना दिसतो. त्यानंतर सलमानने एक माकडाला पाणी देतानाचा व्हिडिओही शेअर केला होता. सलमान सध्या सगळ्याच माध्यमातून सोशल मिडीयावर जोरदार सक्रिय आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*