मेगाभरतीतून विद्यार्थ्यांची मेगालूट : मुंडे

मुंबई :

राज्य सरकार मेगाभरती करणार असल्याचे सांगत आहे. मात्र, त्यातूनही ऑनलाईन अर्ज भरतीच्या नावाखाली सरकार विद्यार्थ्यांची मेगालूट करणार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

याबद्दल ट्विट करून मुंडे यांनी गणित मांडले आहे. त्याद्वारे महापोर्टलच्या घशात सुमारे ६० कोटी घालण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, “जिल्हा परिषदांमध्ये एकाच पदासाठी ३४ प्राधान्यक्रम द्यायचे असल्यास उमेदवाराला १७ हजार रूपये भरावे लागतात. सरकार ११ लाख विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ५०० रू. घेऊन ६० कोटी रुपये महापोर्टलच्या घशात घालत आहे. ही भरती सुशिक्षित बेरोजगारांची लूट करून महापोर्टलची भरती करण्यासाठी आहे का?”

ही लूट रोखण्यासाठी त्यांनी म्हटले आहे की, “मेगाभरती अंतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्यासाठी खुल्या वर्गातील उमेदवारांना आकारण्यात येणारे ५०० रू. व मागासवर्गीय उमेदवारांना २५० रू. हे शुल्क सुशिक्षित बेरोजगारांना परवडणारे नसल्याने ते शुल्क अनुक्रमे १०० रूपये व ५० रुपये असे घ्यावे ही मागणी सभागृहात केली.”

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*