म्हणून मी गप्प राहिलो : एकनाथ खडसे

मुंबई :
एकनाथ खडसे नेहमीच राज्य सरकारला घरचा आहेर करत असतात. त्यात ते नेहमी रागात आणि आक्रमक असतात. पण यावेळी त्यांनी थोडी शांततेत प्रतिक्रिया दिली आहे. ‘तीन वर्षांत माझ्याकडेही अनेकांच्या फाइल्स जमा झाल्या. पण माझ्यावर आली ती वेळ इतरांवर येऊ नये, म्हणून मी गप्प राहिलो’, अशी भावना भाजप नेते एकनाथ खडसे व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षनेता असताना मीही आरोप केले. पण समर्थनार्थ मी कागदपत्रे दिली. माझ्यावरील आरोपांमुळे जे भोगलेय त्याच्या वेदना आजही होत आहेत. यापेक्षा अधिक वाईट प्रसंग माझ्या जीवनात येऊ शकत नाही हे बोलताना खडसे भावनिक होते. ‘शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. सर्व आरोपांची चौकशी करा. कोणी खोटे आरोप करत असेल तर त्यालाही कठोर शिक्षा होईल असा कायदा करा. मला हा डाग घेऊन जायचे नाही’, अशी मनातील खदखद यांनी व्यक्त केली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*