
म्हैसुर :
सत्ताधारी पक्षात येण्यास अनेक जण इच्छुक असतात. अशा आयाराम गयारामांला भाजपची ऑफर आहे. सध्या कर्नाटकमधे राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत.
भाजपात प्रवेश करा अन् 40 कोटी मिळवा;आमदारांना ऑफर भाजपात प्रवेश करण्यासाठी मला 40 कोटींची ऑफर मिळाली मात्र मी त्यास नकार दिला असं जेडीएसच्या आमदाराने सांगितले. कर्नाटकातील एका आमदाराने एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात भाजपची भांडाफोड केली आहे.
जेडीएस आमदार महादेव यांनी “काँग्रेस आमदार रमेश जरकिहोली यांनी काँग्रेस पक्षात राहण्यासाठी 80 कोटी रुपये मागितले आहेत तर भाजपात प्रवेश करण्यासाठी मला 40 कोटींची ऑफर मिळाली मात्र मी त्यास नकार दिला” असे जाहिर कार्यक्रमात सांगितले.
जेडीएस आमदाराने दावा केला की माझ्या उपस्थितीत त्या आमदाराने 80 कोटी रूपये मागितले होते. तसेच मला ऑफर दिल्यावर मि भ्रष्टाचारविरोधी ब्युरोकडे तक्रार करेन असे सांगितले.
Be the first to comment