स्वाभिमानीचे ठरले पण काँग्रेसचे काही ठरेना…

पुणे :
लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असुन त्यात काँग्रेसचा दारूण पराभव झालेला असताना लगेच विधानसभा निवडणुकांचे वारे राज्यात वाहू लागले आहे. पराभवाची चिकित्सा करायलाही काँग्रेसला वेळ मिळत नाहीये. वंचितने काँग्रेसची कोंडी केलेली असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभेला 49 जागा लढवणार असल्याचे सांगितले.नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात दोन दिवसीय कार्यकारणीची बैठक झाली त्यात हा ठराव पास केला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडल्या होत्या. त्यावेळी खुद्द राजू शेट्टी यांनी हातकंणगलेमध्ये पराभूत व्हावं लागलं तर सांगलीमधेही त्यांना पराभव बघावा लागला. त्यामुळे विधानसभेची रणनीती ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 49 जागांवर तयारी सुरु केल्याचं सांगण्यात येत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*