देशावर संघाचा कब्जा चांगलाच : शिवसेना

मुंबई :
सध्या शिवसेना-भाजपचे जिकडे तिकडे कौतुक करताना दिसत आहे. तसेच सध्या त्यांनी सामनाच्या माध्यमातून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीकास्र सोडले आहे. पक्षाच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्ष पद सोडून पलायन केले आहे. सावरकरांना भगोडे-पळपुटे म्हणणारे राहुल गांधी स्वतःच भगोडे आहेत असा खरमरीत टीका शिवसेनेने राहुल गांधी यांना लगावला आहे.

याचवेळी देशाच्या सर्व संस्थांवर ‘संघा’चा कब्जा करण्याचे स्वप्न साकार झाल्याची वेदना राहुल गांधी यांनी व्यक्त केली. यावर त्यांनी ‘आयएसआयचा कब्जा असण्यापेक्षा संघाचा (आरएसएस) कब्जा असणे कधीही चांगले आहे’ असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कौतुक केले.

तसेच राहुल गांधींच्या राजीनाम्याचा व त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा आदर केला पाहिजे. काँगेसला एक चांगला अध्यक्ष मिळो हीच आमची प्रार्थना असल्याचं सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*