आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या उमेदवारीवर टांगती तलवार

नेवासे :
नेवासे विधानसभा मतदारसंघात माजी खासदार दिलीप गांधी इच्छुक आहेत. तसेच विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना असलेला विरोध पक्षाने लक्षात घेतल्यास आमदार मुरकुटेंच्या उमेदवारीवर टांगती तलवार असु शकते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यातील भाजपचे अनिल ताके, पोपट जिरे, डॉ. रावसाहेब फुलारी, कालिदास सानप, अप्पासाहेब साबळे, रामकिसन गर्जे आदींच्या शिष्टमंडळाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आमदार मुरकुटे यांना तालुक्यातून दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यास स्पष्ट विरोध केला. त्यांच्याऐवजी इतर निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याची आग्रही मागणी केली गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*