केंद्रीय अर्थसंकल्प : शेतकरी कल्याण योजना व इतर ठळक बाबी

वर्ष २०२२ पर्यंत देशातील शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्रशासनाचे उदिष्ट असून यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. शेतीपूरक मत्स्य व्यवसाय विकासासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तयार करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत मत्स्योद्योग विभाग, मत्स्योद्योग व्यवस्थापनासाठी एक मजबूत आराखडा उभा करणार या द्वारे पायाभूत सोयी, आधुनिकीकरण, उत्पादन व उत्पादकता वाढवणे आणि गुणवत्ता नियंत्रण यासारख्या मूल्य साखळीतील कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न केला जाणार असून वर्ष २०१९-२० मध्ये १०० नवीन क्लस्टर उभारण्यात येणार आहे.

घर खरेदी सूट तर गृह कर्जावरील व्याजदरातही सूट
४५ लाखांपर्यंत घर खरेदी करणाऱ्या लोकांना दीड लाख रुपयांची सूट देण्यात येणार. तसेच गृह कर्जावरील व्याजदरात मिळणारी सूट २ लाखांहून ३.५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचसोबत इलेक्ट्रीक कार खरेदी करणाऱ्यांनाही करात विशेष सूट देण्यात आली आहे.

अनिवासी भारतीयांना (एनआरआय) १८० दिवसांत आधार कार्ड देणार
ज्या एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधार कार्ड दिलं जाईल, १८० दिवसांसाठी थांबावं लागतं असा नियम आहे, पण आता त्याची गरज राहणार नाही.

स्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती वाढणार
‘स्वच्छ भारत अंतर्गत’ ९ कोटी ६ लाख शौचालय मागील पाच वर्षात बांधण्यात आली. जवळपास ५ लाख ६ हजार गावं हगणदारीमुक्त झाली आहेत. स्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनजमेंट प्रत्येक गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.

३५ कोटी एलईडी बल्ब वितरीत करणार
प्रत्येक घरात वीज देण्यासाठी उजाला योजनेतंर्गत ३५ कोटी एलईडी बल्ब वितरीत करण्यात येतील. १८ हजार३४० कोटी रुपये वर्षाला एलईडी बल्बमुळे बचत होत आहे.

पंतप्रधान कर्मयोगी मानधन योजना जाहीर; छोट्या व्यापाऱ्यांना निवृत्ती वेतन
किरकोळ व्यापारी व छोटया दुकानदारांसाठी प्रधानमंत्री कर्मयोगी मानध ही निवृत्ती वेतन योजना तयार करण्यात आली आहे. वार्षीक उलाढाल दीड कोटींच्या आत असणा-या देशातील तीन कोटी किरकोळ व्यापारी व लहान दुकानदारांना याचा फायदा होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*