फरारी खेकडे दिले नौपाडा पोलिसांकडे..!

मुंबई :

शिवसेनेचे उच्चशिक्षित राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरण दुर्घटनेला खेकड्यांना जबाबदार धरणारे बेजबाबदार विधान केल्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यावर विशेष बातमीपत्र सदर केलेले असतानाच सरकारच्या या बेजबाबदार कृतीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फरारी पकडून नौपाडा पोलीस ठाण्यात दिले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या स्टाईलने आंदोलन करून सरकारच्या बेजबाबदार कृतीचा निषेध केला आहे. त्यांनी यापूर्वीच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या खेकड्यांना अटक करण्याची मागणी केली होती. आता त्यांनी थेट बेजबाबदार खेकडे पकडून आणून पोलिसांमध्ये देऊन राज्य सरकारचा निषेध केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*