बाब्बो.. वाढले की पेट्रोलचे दर..!

मुंबई :

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच पेट्रोल व डिझेलचे भाव दणक्यात वाढले आहेत.

जागतिक बाजारात इंधनाचे दर कमी झालेले असतानाच विकासाला २८ हजार कोटी रुपये अतिरिक्त निधी गोळा करण्यासाठी अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि रस्ते व पायाभूत सेवा उपकर याच्या नावाने जास्तीचे २ रुपये केंद्र सरकार घेणार आहे. त्याचाच फटका म्हणून आता दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत २.४५ रुपये प्रति लीटरने तर, डिझेलच्या किंमतीत २.३६ रुपये प्रति लीटरची वाढ झाली आहे.

मुंबईत आज पेट्रोल ७८.५७ रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. एकूणच जागतिक बाजारात इंधनाचे भाव कमी होऊनही भारतीय जनतेला त्याचा कोणताही लाभ न देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोडी सरकारचे पाच वर्षांपूर्वीचे धोरण यापुढेही चालणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्याबद्दल जनता कोणत्या पद्धतीने व्यक्त होते, याकडे सरकारचे लक्ष आहे. त्यानुसार पुढचे दरवाढीचे धोरण ठरेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*