तिथे मिळतात नमो व अमित शाह नावाचे आंबे..!

दिल्ली :

मार्केटिंग हे एक कल्पक आणि मजेशीर तंत्र आहे. या तंत्रावर हुकुमत असलेला बाजारपेठेवर राज्य करतो. मग ती बाजरपेठ आठवडा बाजार असो की जागतिक. दिल्लीतही आंबा महोत्सवात त्याचीच झलक पाहायला मिळत आहे. इथे चक्क नमो आणि अमित शाह नावाचे आंबे विकले जात आहेत.

पर्यटन विभाग व दिल्ली सरकारने आयोजित केलेल्या या अंबा महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले. या महोत्सवात सुमारे ५०० प्रकारचे आंबे विक्रीला आलेले आहेत. मात्र, ग्राहकांनी नावामुळे नमो व अमित शाह या आंब्यांना विशेष पसंती दिली आहे. दिल्लीतील जनकपुरी येथे दिल्ली हाटमध्ये मँगो फेस्टिवल सुरू आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*