माझी उमेदवारी फायनल : बाळासाहेब मुरकुटे

नेवासे :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यातील राजकीय हलचालींना वेग आला असून राजकीय डाव-प्रतिडाव खेळले जात आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपली उमेदवारी पक्की असल्याचे म्हटले आहे.

नेवासे विधानसभा मतदारसंघातील भाजप निष्ठावंतानी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे आणि मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. त्यात पुन्हा बाळासाहेब मुरकुटे यांना संधी दिल्यास आपण ही जागा जिंकू शकत नाही. त्यामुळे उमेदवार बदलण्याची मागणी केली. यानंतर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी या भाजप निष्ठावंतावर टीका करत ‘मला उमेदवारी देऊ नका म्हणणारे विरोधकांचे हस्तक आहेत’ असे सांगितले.

यावेळी भाजप हा जनमतावर विश्वास ठेवणारा पक्ष असल्याने माजी आमदार गडाखांनी माझ्या उमेदवारीत कितीही अडथळे आणले, तरी त्यांचे मनसुबे टिकणार नाहीत, असे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शुक्रवारी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख व बाळासाहेब मुरकुटे यांची लढत होऊ शकते. अशावेळी भाजपचेच सचिन देसरडा, राष्ट्रवादीचे डॉ. क्षितिज घुले, माजी आमदार तुकाराम गडाख, माजी आमदार संभाजीराव फाटके यांच्या भूमिकांमुळे स्थानिक राजकारणाची दिशा बदलू शकते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*