गडकरींची खासदारकी धोक्यात?

नागपूर :
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभुत उमेदवार व काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. यामुळे गडकरी यांची खासदारकी धोक्यात आली आहे. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमुळे गडकरी यांच्या खासदारकी समोर आव्हान निर्माण झाले आहे.

निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान गडकरी यांनी आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप केला आहे. गडकरी यांनी नियमांचे पालन न केल्यामुळे ही निवडणूक रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यावरही अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*