घर घेणाऱ्यांना मोठी सुट, तर नवकोटनारायणांच्या करात वाढ

दिल्ली :
नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात घर घेणाऱ्यांना घसघशीत सुट मिळणार आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना आनंद देणारी ही बातमी आहे. घर खरेदीवर घसघसीत सूट मिळणार आहे. कोणत्याही व्यक्तीने ४५ लाखापर्यंत घर खरेदी केल्यास प्राप्तिकरातून दीड लाख अतिरिक्त सूट मिळणार आहे. मार्च २०२० पर्यंत घर घेणाऱ्यांसाठी ही सूट लागू होणार आहे.

तसेच नवकोटनाराणयण म्हणजे कोट्याधीश लोकांना अतिरिक्त कर लागू होणार आहे. दोन कोटीपासून अडीच कोटीपर्यंत उत्पन्न असलेल्यांना आता ३ टक्के अतिरिक्त कर द्यावा लागणार आहे. पाच कोटीपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आता ७ टक्के अतिरिक्त कर द्यावा लागेल. याबरोबरच बँकेतून वर्षाला एक कोटीहून अधिक रक्कम काढल्यास २ टक्के टीडीएस लावला जाणार आहे. दोन कोटीपर्यंत उत्पन्न असलेल्या कर रचनेमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*