म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले..!

मुंबई :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प जाहीर केला. पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवल्याने देशभरात आज पेट्रोलचे दर प्रतिलीटर सुमारे अडीच रुपयांनी तर डिझॆलचे दर प्रतिलिटर सुमारे 2 रुपये 30 पैशांनी वाढले आहेत.

शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्युटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस वाढवण्यात आले आहेत. याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली होती. यानंतर लगेचच पेट्रोल आणि डिझेल च्या दरामधे वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे तब्बल 28 हजार कोटींची भर सरकारी तिजोरीमध्ये पडणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

आगामी काळात पेट्रोलचे दर नऊ रुपये तर डिझेलचे दर चार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल. त्यामुळे आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*