Blog | गायब मुलांचे नेमके काय..?

गायब झालेल्या मुली आणि लहान मुले पुन्हा सापडण्याचे प्रमाण किती आहे? गायब झालेल्यांची संख्या किती आहे? माझ्या अंदाजे वर्षाला किमान पन्नास एक हजार तरी मुलींचा आणि लहान मुलांचा शोध लागत नाही. गायब होऊन कुठे जातात हे सगळे? इंटेलिजन्स, पोलीस यांचं देशभरात एवढं मोठं जाळं असूनही हे सगळे कुठे सापडत कसे नाहीत?

चौकाचौकात जे भिकारी बसलेले असतात त्यांच्याकडे कधीही पाहिलं तरी एक लहान मूल कडेवर शांतपणे झोपलेलं असतंच. ते मूल कधीही मोठं का होत नाही? ते शांतच का झोपापलेलं असतं? कधी रडताना का दिसत नाही? तर, त्यांना शांत बसण्यासाठी गांजा दिलेला असतो. काही वर्षांपूर्वी पुण्या मुंबईत कुठेतरी असे काही लोक पकडले गेले होते. लहान मुलांना गांजा देऊन शांत ठेवायचे, गांजामुळे भूक लागत नाही, म्हणून ते रडतही नाहीत. हि मुले कुणाची? कोठून आली? यांच्याकडे सतत लहान मुलेच का दिसतात? दोन वर्षांपूर्वीची लहान मुले आता चालण्यासारखी मोठी झाली असतील.. ती कुठे गेली ? पाच वर्षांपूर्वीची आता बऱ्यापैकी समजण्याएवढी मोठी झाली असतील? ती आत्ता कुठे असतील? दहा वीस वर्षांपूर्वी गायब झालेली आता जिवंत तरी असतील का? असतील तर काय अवस्थेत असतील?

तस्करी होत असेल? होत असेल तर, वर्षभरात २५ हजार मुलींची जरी तस्करी होत असेल तर प्रति मुलगी लाखभर रेट च्या हिशोबाने वर्षाला अडीचशे कोटींची उलाढाल होत असेल. एवढीच लहान मुले गायब होतात. यांचीही चार पाचशे कोटींची उलाढाल असेल… कारण वाढणारं प्रोडक्ट आहे. स्वतःहून मुलींची, लहान बाळांची विक्री करणारे आईबाप सुद्धा आपल्या देशात कमी नाहीत. तो आकडा तर वेगळाच निघेल.

या विषयावर कुणीच कसं बोलत नाही? आपल्याला प्रश्न सुद्धा का पडत नाही? सरकार, विरोधक, सामाजिक कार्यकर्ते, उद्धारकर्ते, आंदोलनकर्ते सगळेच या विषयावर गप्प का असतात? आपल्याला तरी हा प्रश्न विचारण्यासाठी माध्यम काय आहे ? प्रश्न विचारायची संधी जरी मिळाली तरी कुणी उत्तर तरी देईल का? कि प्रश्न विचारणाराच रात्रीत गायब होईल? एक मुद्दा वाचताना हा विषय समोर आला म्हणून मी लिहीलं … यापुढे आपल्या हातात तरी काही आहे का?

लेखक : श्रीकांत आव्हाड, अहमदनगर

https://www.facebook.com/shrikant.avhad

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*