OnePlus 7 चं नवं व्हेरिअंट लाँच; पहा किंमत व फीचर्स

टीम कृषीरंग :

वनप्लस कंपनीने आता 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असलेले वनप्लस 7 चे नवीन व्हेरिअंट ‘मिरर ब्ल्यू कलर’मध्येही उपलब्ध करण्याची घोषणा केली असुन ते लकरच बाजारात विक्रीसाठी असेल.

दि. 15 जुलै रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान हे नवं व्हेरिअंट विक्रीसाठी उपलब्ध केलं जाणार आहे. अ‍ॅमेझॉन तसेच वनप्लसच्या अधिकृत संकेतस्थळावरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो. वनप्लस 7 च्या मिरर ब्ल्यू व्हेरिअंटची किंमत 32 हजार 999 रुपये आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 1,750 रुपये कॅशबॅक मिळणार. 8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 37 हजार 999 रुपये आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*