गांधी जयंतीनिमीत्त भाजप खासदार काढणार पदयात्रा..!

टीम कृषीरंग :

आतापर्यंत भाजप कार्यकर्ते ‘जय श्रीराम’ असे लिहून हजारो पत्र पाठवणार हे तुम्ही पाहिले असेल पण आता भाजप खासदार तब्बल 150 किलोमीटरची पदयात्रा काढणार आहेत. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींची 150 जयंती साजरी केली जाणार आहे. महात्मा गांधी जयंतीचे निमीत्त साधून हि पदयात्रा काढली जाणार आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या खासदारांना हे आदेश दिले आहेत.

लोकसभा सदस्यांप्रमाणेच राज्यसभा सदस्यांना सुद्धा प्रत्येकी एक-एक मतदार संघ दिला जाणार आहे. त्यामध्ये राज्यसभा सदस्यांना महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या संघर्षावर कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत. ही पदयात्रा 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर म्हणजे जवळपास महिनाभराची असेल. पंतप्रधान मोदींच्या निर्देशानुसार हि पदयात्रा काढण्यात येणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*