तर गाडीच सुरू होणार नाही : नितीन गडकरी

दिल्ली :

स्टँड खाली असल्यास किंवा मोबाईल कनेक्टीविटी शिवाय गाडी चालू होत नाही अशी सुविधा आता दुचाकीसाठी आली आहे. यानंतर आलेल्या संशोधनाने मात्र तळीरामांची दुविधा होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की दारू पिऊन वाहन चालवत असाल तर गाडीच सुरू होणार नाही, अशा प्रकारचं तंत्रज्ञान दुचाकी आणि चारचाकी वाहनात बसवण्याचा विचार आहे. राज्यसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सोबतंच वाहन चालकानं सीटबेल्ट घातला नसल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला आपोआप माहिती मिळेल असेही यंत्रना या तंत्रज्ञानात आहे.
यमुना एक्सप्रेसवर झालेल्या अपघातासंदर्भात माहिती विचारल्यावर या प्रश्नाचं उत्तर देताना गडकरी यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*