रताळे खाण्याचे हे आहेत अविश्वसनीय फायदे; वाचा थोडक्यात

आषाढी एकादशीला साबुदाणा खिचडी व वड्यांना पर्याय म्हणून किंवा जास्तीतजास्त जोड म्हणून मराठी माणूस रताळे खातो. मात्र, गोड बटाटा (स्वीट पोटॅटो) म्हणून जगभर ओळख असलेल्या या गोड कंदमूळाचे आरोग्याला असणारे फायदे लक्षात घेता हा पदार्थ आपल्या रोजच्या आहारात येण्याची गरज आहे.

रताळे कच्चे, उकडून, भाजून किंवा त्यापासून एखादा चमचमीत पदार्थ बनवून खाण्यासाठी वापरतात. जातीनिहाय काही रताळे पांढरे, काही केशरी तर काही पिवळट रंगाचेही असतात. मात्र, बाजारात ही कंदमुळे खरेदी करताना चांगली पाहून घ्यावीत. अनेकदा खोडून काढताना मार लागून किंवा जमिनीतील कीटकांच्या किडीमुळे हे कडू चवही देतात. कडू भाग काढून आपण हा पदार्थ सहजतेने खाऊ शकतो.

यामध्ये कॅन्सरशी लढणारे घटक असल्याचे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे. यातील प्रोटिझ इनहिबिटर हे प्रोटिन कॅन्सर पेशींच्या वाढीला थांबवण्याची क्षमता या प्रोटिनमध्ये असल्याचे वैज्ञानिकांना आढळले आहे.

रताळ्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सावकाश पद्धतीने सुरू राहून लवकर भूक लागत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते.

यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए (जीवनसत्व अ) असते. आपले डोळे आणि त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी हे महत्वाचे जीवनसत्व असल्याने आजारपणही जास्त उद्भवत नाही.

रताळ्याच्या केशरी आवरणामध्ये बिटा केरोटिन हे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे आकॅन्सर तसंच डोळ्यांच्या आजारांचा धोका टळतो.

यातील व्हिटॅमिन सी (जीवनसत्व क) खाणाऱ्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तर, पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासह कॅल्शिअममुळे हाडांना मजबुती मिळते.

रताळे हा आयर्नचा म्हणजे लोहाचा स्रोत आहे. त्यामुळे खाणाऱ्यांची हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*