कोणावरही हल्ला आमच्या संस्कृतीत नाही’ : नितेश राणे

सिंधूदुर्ग :
उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. काही दिवसांच्या तुरूंगवारीनंतर आमदार राणेंना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला.

या दरम्यान मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रकाश शेडेकर यांच्या घरी जाऊन भेट दिली. माध्यमांनीही शेडेकर याची बाजू समोर आणली. आता सुटका झाल्यावर नितेश राणे यांना आपली बाजू माध्यमांसमोर मांडली.

माझं आंदोलन हे जनतेचं आंदोलन होतं. जनतेसाठी आंदोलन होतं. त्यामुळेच, अनेक सामाजिक संघटना, संस्था आणि लोकांनी आम्हाला पाठींबा दिला. त्यामुळे आम्हाला आतमध्ये ऊर्जा मिळाली. त्या सर्वांचे मी आभार मानतो, असे नितेश राणेंनी म्हटले.

राणेंनी केले आपल्या कृतीचे समर्थन
जेव्हा बैठका, आंदोलनं, निवेदन हे पर्याय जेव्हा संपतात तेव्हाच अशा पद्धतीची आंदोलन होतात, असे म्हणत नितेश राणेंनी त्यांच्या कृतीचं एकप्रकारे समर्थन केलं आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*