सदाभाऊंचे राजू शेट्टींना ओपन चॅलेंज

पुणे :
मंगळवारी पुणे येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कार्यशाळेत बोलत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी अचानक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते ऊभे राहून पुढे आले आणि शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम मिळत नसल्याचा आरोप करत सदाभाऊंसमोर गोंधळ घातला. त्यानंतर खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा झोळे, अजिंक्य नागटीळकर, सूरज पवार, सूरज पंडित, सौरभ बळवडे आदीना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते.

राजू शेट्टींवर केली टीका
आपली लढाई बाजाबुणग्यांशी नसून त्यांनी तारीख, वार आणि मैदान ठरवावे. मी दोनहात करायला तयार आहे. वास्तविक पाहता, त्यांनी लोकसभेला झालेला पराभव पचवावा, उगी कडक लक्ष्मी अंगात येऊन थयथयाट करण्यापेक्षा संघटनेची पडझड थांबवावी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*