गोव्यात काँग्रेसचे उरले फक्त पांडव..!

पणजी :
सध्या काँग्रेस खिळखिळी झालेली आहे. भाजप जमेल तिथे मॅनेजमेंट करून काँग्रेस युक्त भाजप करत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं आघाडीचं सरकार आधीच ऑक्सिजनवर आहे. त्यातच शेजारी असणार्या गोव्यात भाजपची सत्ता असतानाही दहा आमदार आपलेसे करण्यात भाजप यशस्वी झाला आहे. त्यामुळे आधीच लोकसभेतील पराभव त्यानंतरचे राजीनामा सत्र आणि आता काँग्रेस आमदारांचा भाजप प्रवेश यामुळे काँग्रेसची अवस्था बिकट होत चालली आहे.

गोव्यामधेही विधानसभेतील विरोधी पक्षनेता फोडण्यात ते यशस्वी झाले आहेत. 10 आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बरोबर जाऊन विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये सामील झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*